आमोदे गावात तहसिलदार महाजन यांचा हस्ते सेपीया औषध फवारणी



                                     शिरपूर :  दिनांक 10/08/2020 रोजी तालुक्यातील आमोदे येथे श्री सारंगेश्र्वर महादेव मंदिर येथील प्रांगणात तहसिलदार  श्री आबा महाजन यांच्या शुभ हस्ते होमियोपॅथीक औषध सेपीया 200 औषधाच्या फवारणीचा शुभारंभ  आमोदे गावापासून झाला. यावेळी आमोदे गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री जगदिश देशमुख, डॉ. योगेश जाधव, डॉ. पितांबर दिघोरे, डॉ. संजय रूद्रे, डॉ. अकील नोमानी व गावातली तरूण व जेष्ठ मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. योगेश जाधव यांनी सुरूवातीला होमियोपॅथीक औषध सेपिया 200 चे महत्व विषद करतांना सांगितले कि प्रत्येक कोरोना पेशंट असेल किंवा नसेल त्यांच्या घरी, गल्ली, बोळ, कॉलनी परीसर, आमोदे फाटा, तसेच सरकारी हॉस्पिटल, नगर पालिका व खाजगी दवाखाने, व्यापारी संकुले, किराणा दुकाने, छोटे मोठे व्यवसाय, ग्रामपंचायत स्तरावर, नगरपालिका स्तरावर  ई. ठिकाणी पाच ते दहा ML प्रति लिटर पाण्यात टाकून फवारावे या औषधाचा मानवी शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट नाही व वातावरणामध्ये या औषधाची मात्रा हि सात ते एकविस दिवसापर्यंत टिकून राहते व हे औषध दिडशे रूपया मध्ये 100 ml इतके स्वस्त मिळतें व महीने दोन  महिने एका घरात पुरते इतके किफायतशीर आहे या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
तहसीलदार महाजन यांनी सांगीतले की प्रत्येक अभियानाची सुरूवात ही आमोदे गावा पासूनच होते व या होमियोपॅथी औषध सेपिया 200 फवारणीच्या शुभारंभ सुद्धा आमोदे गावातूनच होत आहे याचे कारण या गावामध्ये असलेली एकता व इथले सरपंच जगदीश देशमुख यांचे नेतृत्व चांगले आहे असे  सांगीतले. तसेच ज्या प्रमाणे पहिले कोरोणा पेशंट आमोदे गावात सापडल्या नंतर आमोदे गावाने जो लॉकडाऊन पाडला एवढा कडक लॉक डाउन चार महिन्याच्या या कोरोणा काळात मी असा लाॅक डाउन आता पर्यंत पाळलेला तालुक्यात बघितला नाही याची फलश्रुती म्हणुन चार महिण्यानी आत्ता फक्त एकच पेशंट सापडलेला  आहे त्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी व आमोदे ग्रामपंचायतीने लगेच तत्परता दाखवुन होमियोपॅथी औषधाचे फवारणीचे नियोजन केले आत्ता पर्यंत सगळयात जास्त वेळा फवारणी करणारे गाव हे आमोदे ठरलेले आहे व त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यात आधी पुढाकाराने होमिओपॅथी गोळ्या आर्सेनिक अल्बम 30, आयुष काढा वाटप तसेच आत्ता सेपिया 200 या होमियोपॅथी औषधांची फवारणी असाच आदर्श आमोदे गावाकडून प्रत्येक गावाने घेऊन वाटचाल केल्यास आपल्याला कोरोनावर महिन्याभरातच मात करता येइल व प्रशासनाची पण जास्त गरज पडणार नाही असे गौरवउदगार आमोदे गावाबद्दल व ग्रामस्थांबद्दल काढले. डॉ. संजय रुद्रे यांनी सांगितले की सेपिया 200 हे औषध आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दररोज दोन थेंब लावून झोपल्यास लहान मुलांपासून वयोवृद्ध सगळयांचा कोरोना पासून आपला बचाव करता येवू शकतो. डॉ. अकील नोमाणी यांनी सुद्धा होमिओपॅथी औषध सेपिया 200 फवारणीचे महत्त्व विषद केले व ते प्रत्यकाने एकापासून दुसऱ्याला सांगितल्यास व स्वतः घरी फावारल्यास सुध्दा कोरोना पासून बचाव करता येईल असे सांगीतले. डॉ पितांबर दिघोरे यांनी कोरोणा जनजागृतीपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रल्हाद सोनार यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी रणजीत देशमुख, लालू पाटील, मुन्ना देशमुख, यशपाल राजपूत, भैय्या (दरबार) राजपूत, दादु देशमुख, योगेंद्र राजपूत, रविंद्र राजपूत, पोलिस पाटील निखील देशमुख मंदिराचे पुजारी व मंदिराचे सहकारी राजु राणावत व ग्रामसेवक विनोद कोळी यांनी  सहकार्य केले आभार प्रदर्शन श्री राज देशमुख यांनी केले व महादेव मंदिराच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षा रोपन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने