लातूर प्रतीनीधी राहुल शिवणे
उदगीर - गंगाखेड येथे राष्ट्रीय वारकरी परिषद संघटनेच्यावतीने भजन-कीर्तनात परवानगी द्यावी
म्हणून तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले.
अनेक उद्योगधंदे व्यवसाय दुकान यांना चालू करण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे
तशीच परवानगी मंदिरात दर्शनासाठी व भजन कीर्तनासाठी द्यावी ही विनंती महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अनेक भक्तांचे नित्य नियम आहेत मंदिरातील देवाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न , जेवण सुद्धा करत नाहीत त्यासाठी शासनाने नियम, अटी लावून मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी,त्याचबरोबर भजन व कीर्तन याला सुद्धा परवानगी मिळावी
महाराष्ट्रात अगदी दारूच्या दुकानांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे मग मंदिरातील दर्शनास का नाही असा प्रश्न महाराष्ट्रातील संबंध वारकऱ्यांच्या मनात आहे. या काळामध्ये अनेकांना या संकटांमध्ये नैराश्य आलेला आहे या नैराश्याला दूर करण्यासाठी वारकरी संप्रदायातील भजन कीर्तन या माध्यामातुन नैराश्याला तोंड देता येते ,शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आम्ही कीर्तन भजने करण्यास कटिबद्ध आहोत त्यामुळे आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला कीर्तन व भजन व मंदिरातील दर्शनास व मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी ही विनंती असे राष्ट्रीय वारकरी परिषद परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री ह भ प युवाकीर्तनकार आकाश महाराज यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रीय वारकरी परिषद परभणी जिल्हा अध्यक्ष , श्री ह भ प युवाकीर्तनकार आकाश महाराज खोकले ,
जिल्हा संपर्क प्रमुख श्री ह भ प रोहिदास महाराज मस्के , गोविंद यादव ( ता अध्यक्ष काँग्रेस ), जिल्हा सल्लागार श्री ह भ प माणीक महाराज शास्त्री गंगाखेडकर ,श्री ह भ प कृष्ण महाराज नागरगोजे तालुका संपर्कप्रमुख ,श्री ह भ प रामेश्वर महाराज गुडे शहरप्रमुख , श्री ह भ प दत्ता दडगे शहर उपप्रमुख मंदार कुलकर्णी (धारकरी हिंदु प्रतिष्ठाण ) हे उपस्थित होते
