नाशिक, इंदिरानगर वार्ताहर : - परिसरातील अवजड वाहनाची वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक तीस चे नगरसेवक अँड श्याम बडोदे यांनी पोलीस उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी ,इंदिरानगर पोलीस ठाण्याचे व पो नि नीलेश माईनकर यांना निवेदन देऊन केली
पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार इंदिरानगर परिसरात मोठ्या वसाहती असुन . त्यामुळे सदर परिसर जेष्ठ नागरिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो.सदरील परिसर वडाळा पाथर्डी रस्ता असून रस्त्याचा दोन्ही बाजूला मोठ मोठी मंदिरे , चर्च , नामांकीत शाळा , महाविद्यालये , बँका , भाजी मार्केट व मोठ मोठे रहिवासी इमारती तसेच रहीवासी कॉलनी आहेत . असे असतांना काही दिवसांपासून इंदिरानगर मधील वडाळा - पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांच त्यात मोठे मोठे कंटेनर्स , ट्रक्स , टॅन्कर्स , माल वाहतुकीच्या गाड्या यांची वाहतूक सुरु आहे.त्यामुळे दररोज लहान - मोठे अपघात होत आहेत.जेष्ठ नागरीकांना लहान मुलांना व महीलांना रस्त्यावरून जाणे अथवा रस्ता ओलांडणे अशक्य झालेले आहे , जीव मुठीत घेऊन नागरिक सदरच्या अडचणीला तोंड देत आहे.वेळोवेळी संबधीत विभागाकडे सदर बाबत विचारणा विनंती केली असता सुरवातीस सदर वाहतूक प्रायोगिक तत्वावर असल्याचे सांगण्यात आले होते.मात्र सुमारे तीन महिन्यांपासून अवजड वाहनांची वाहतूक हि नित्त्याची झालेली आहे.त्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्थाप सहन करावे लागत आहे व नागरीकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे . तरी सदर बाबींचा गंभीर विचार होऊन इंदिरानगर परिसरातील अवजड वाहनांची वाहतूक त्वरीत बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी नगरसेवक अँड श्याम बडोदे भानुदास शौचे आदी उपस्थित होते
Tags
news
