नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून.
नाशिक-: रि.पा.ई (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त श्री. रघुनाथ गावडे साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की नांदेड जिल्ह्यातील माळेगाव (यात्रा) ह्या ठिकाणी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याप्रकरणातील खरा सुत्रधार कोण आहे हे शोधण्यासाठी सीआयडी मार्फत चौकशी करा.
२)सध्या महाराष्ट्रात जातीयवादी घटना मध्ये वाढ होत असून नाशिकमध्ये दिवाकर आडके हे नाशिक येथील किशोर सुधारलयात सफाई कामगार असून गैरप्रकाराला विरोध केल्याने त्यांना निलंबित केले असून ते महसूल आयुक्त कार्यालयासमोर कुटुंबीय समवेत उपोषणाला बसले आहेत ते ह्या खात्यात सुमारे ३० वर्षीपासून प्रशासनाची सेवा केली आहे परंतु काही जातीयवादी अधिकारी त्यांचा मानसिक छळ करून त्यांचा पगार रोकणे जातीय वाचक शिवीगाळ करणे हे सहन न झाल्याने त्यांनी वरिष्ठांकडे याची तक्रार केली परंतु त्यांची कोणीही दखल घेतली नाही उलटे त्यांनाच निलंबित केले.
आम्ही माननीय विभागीय उपायुक्त साहेब यांना ह्या प्रकरणाकडे लक्ष घालून त्यांना पुर्ववत नोकरीवर घ्यावे अशी विनंती केली.
ह्याप्रसंगी रि.पा.ई (आठवले)उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,रि.पा.ई (आठवले)नाशिक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.गुफाताई भदरगे,रि.पा.ई(आठवले)एरंडोल तालुका अध्यक्ष मा.प्रविणभाऊ बावीस्कर,एरंडोल तालुका सरचिटणीस सिताराम मराठे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
