शिरपुर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी*
कोरोनाचा काळात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याच कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होत असून शाळा कॉलेज तसेच खाजगी क्लासेसचे संचालक यांनी कोरोनाचा काळात कोणतीही फि वाढ करू नये.तसेच शक्य झाल्यास शुल्क कमी करावे आवश्यकतेनुसार फि टप्पा-टप्पाने भरण्यास सवलत द्यावी.
कोरोनाचा काळात सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे धुळे जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिरपुर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम पाटील व शिरपुर शहर अध्यक्ष भुपेश पाटील यांनी केले आहे.
Tags
news
