शिरपूर येथे उत्तर महाराष्ट्रातील पहीले योग महाविद्यालय,शिरपूरकरांसाठी गौरवाची बाब





शिरपूर  शिक्षणाची अनेक दालने शिरपूर मध्ये उपलब्ध आहेत.उच्च दर्जाचे शिक्षण आज हजारो विद्यार्थी घेत आहेत.त्यातच आता येथील निमझरी नाका परिसरातील योग विद्या धाम संस्थेला योग महाविद्यालय चालविण्यासाठी  मान्यता मिळाली  आहे.
      शहरातील  योग विद्या धाम ही संस्था गेल्या १८ वर्षांपासून योगशिक्षणाचे कार्य करीत आहे.
संस्थेतर्फे नेहमी आरोग्य व योग या विषयात जनजागृती करण्यासाठी  व्याख्याने, योगवर्ग ,कार्यशाळा घेण्यात येत असतात. संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा योगशिक्षक  हा पदविका अभ्यासक्रम गेल्या ५ वर्षांपासून राबवीला जात आहे. यापूर्वी हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा योग शिक्षक डिप्लोमा हा अभ्यासक्रम ही सतत ३ वर्षे राबवीला गेला.आतापर्यंत किमान ५०० योगशिक्षक बाहेर पडले असून हजारो साधकांनी योगवर्ग केलेला आहे.



     योशिक्षणाचे महत्व लक्षात घेत अनेक योगशिक्षकांनी योगशास्रातील  पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्ती केली होती. संस्थेने या संदर्भात प्रस्ताव पाठविला होता.तो  विद्यापीठाने व शासनाने संस्थेचे विविध उपक्रम,विविध ठिकाणी झालेली निवड व सस्थेचे कार्य पाहून संस्थेला योग महाविद्यालय चालवीण्यास मान्यता  दिली आहे.
विशेष  म्हणजे सदर महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील स्वतंत्र असे पहिलेच योग महाविद्यालय आहे. सदर महाविद्यालय कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक (नागपूर ) या विद्यापीठाशी संलग्न  आहे. या महाविद्यालयाचे नाव  भूपेशभाई रसिकलाल पटेल योग महाविद्यालय असे करण्यात आलेले आहे.
     माजी मंत्री अमरीशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी 
योग विद्या धाम संस्था  उभी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.तर  धुळे येथील योग तज्ञ गं.ग.बारचे यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत असते.तसेच संस्थेला नेहमीच नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,जिल्हा परिषद अध्यक्ष व किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे,आर.सी.पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांचेही सहकार्य लाभत असते.

       या शैक्षणिक वर्षांपासून पासून एम.ए. (योगशास्र) सूरु होत असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सूरु होत आहे.  विद्यार्थ्यांनी या योगशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष अमरीशभाई पटेल यांनी केले आहे. संस्थेसाठी डॉ.श्रीकांत वाडीले,डॉ.वर्षा वाडीले,अॕड.एस आर सोनवणे,राजेंद्र सोनवणे,सुनिल माहेश्वरी,जी.व्ही,पाटील,गणेश सोनार,परमानंद वधवा,संध्या पोतदार,सुधीर वेळापूरे,रविंद्र जायस्वाल,जितेंद्र पोतदार,विनोद सूर्यवंशी , विनोद शर्मा,मोहन पाटील,योगेश गुजराथी,डॉ.जितेंद्र शहा,नरेंद्र पटेल,मधुकर माळी,दुर्गेश सोनवणे  मेहनत घेत असतात.

 गेल्या १८  वर्षापासून शहरात योग  विद्या धाम संस्थेच्या माध्यमातून  योगा अभ्यासाचे काम सुरू आहे.याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेतला पाहिजे.भूपेशभाई नेहमी स्वतः सातत्याने योगाभ्यास करीत असतात. ते  कोणालाही आरोग्याची समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात.या महाविद्यालयाला त्यांचेच नाव दिले जात असल्याने आनंद आहे. 
   अमरीशभाई पटेल,संस्थेचे अध्यक्ष 

     अमरीशभाई यांच्या दूरदृष्टीतून योग विद्या धाम संस्थेची स्थापना झाली आहे. संस्थेत सातत्याने योग वर्ग सुरू असतात.आता संस्थेला योग शास्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.त्यामुळे शहरातच संस्थेच्या माध्यमातून योगशास्रा चे  उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.आणि आरोग्यासाठी नेहमी दक्ष असणारे भुपेशभाई पटेल यांचे नाव महाविद्यालयाला देण्यात येत आहे.
   डॉ. श्रीकांत वाडीले, संस्थेचे कार्याध्यक्ष

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने