दोंडाईचा : अयोध्या येथे प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहणे सर्व भारतीयांचे स्वप्न होते ते प्रत्यक्षात साकाराले जात आहे या स्वप्नपूर्ति सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षी होत आहोत या आनंदमयी सोहळ्यात आपण सर्वजण सामील झाले पाहिजे व यासाठी घरोघरी गुढी उभारणे, जय श्री राम नावाची रांगोळी काढून , रात्री दिवे लावून घरूनच या उत्सवात आपण सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आ जयकुमार रावल यांनी केले आहे
याबाबत बोलताना आ रावल म्हणले की ,आपण सर्वजण अयोध्या येथे प्रत्यक्ष जावून या सोहळ्याच्या आनंद घेऊ शकत नाही म्हणून हीच आपली पावन भूमि अयोध्या समजून आनंद सोहळा साजरा करुया, जवळपास 500 वर्षांपासून रामजन्मभूमी चा विषय प्रलंबित होता सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर हा विषय संपला असून येत्या 2 वर्षात याठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभे करून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले असून यासाठी त्यांच्या हस्ते आज दि 5 रोजी भूमिपूजन होत हा दिमाखदार सोहळा आपण सर्वांनी टी व्ही च्या माध्यमातून सर्वांनी अवश्य पाहून आनंदोत्सव साजरा करूया असे आवाहन आ रावल यांनी केले आहे
Tags
news

