शिरपूर - धुळे जिल्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्या जवळ मजूरांचा वाहनाचा भिषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजता घडली आहे.यातील 15 ते 20 मजुरांना नरडाणा व सोनगीर आरोग्य केद्रात दाखल करण्यात आले तर 20 ते 25 मजूरांना धुळे येथे हलवण्यात आले आहे .या वाहनात 50 ते 60 मजूर भरले होते अशी माहिती प्रत्यकदर्शी नी दिली आहे .यात 1 मजुरांचा चा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच शिरपूरचे आमदार काशिराम पावरा हे घटनास्थळी दाखल झाले होते. यांनी मदत कार्य करून मजुरांना धीर दिला.
सेधवा मध्यप्रदेश येथून शेतात मजूरी कामासाठी मध्यप्रदेश येथून महाराष्ट्र येणाऱ्या पिक अप वाहनाचा टायर फुटल्याने पिक अप वाहन पलटी होऊन अपघात झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे . .घटनास्थळी नरडाणा पोलीस स्टेशनचे योगेश राजगुरू यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.शिवसेनेचे विजय सिसोदे यांच्यासह नरडाणा येथील ग्रामस्थ मदतीसाठी दाखल झाले होते.
मात्र या घटनेमुळे निरपराध व पोटाची भूक भगवण्यासाठी मजुरी करणाऱ्यांना आपला जीव गाववावा लागला आहे तर काहींना गंभीर जखमी झाले आहेत.
या महा मार्गावर नेहमीच अश्या प्रकारे मजुरांची अमानुष व नियम बाह्य वाहतूक होत असते. मागील महिन्यात देखील असे वाहतूक करणारे वाहन तहसीलदार शिरपूर यांनी अडवून गुन्हा दाखल केला होता.यात देखील 66 मजूर भरण्यात आले होते.
माल वाहू पिकअप वाहनात नेहमीच 50 ते 60 मजुरांना कोंबून ही वाहतूक केली जात असते.मात्र ही वाहने महामार्ग पोलीस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत येत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काय प्रशासन कोणाच्या बळी जाण्याच्या प्रतीक्षेत होते का ? अजून किती बळी जाण्याची आपण वाट पाहत आहेत ? त्या मुळे किमान या पूढे तरी अश्या वाहनावर महामार्ग पोलीस आणि परिवहन अधिकारी कारवाई करतील काय ? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
Tags
news
