शहादा (प्रतिनिधी) : मोहिदा (शहादा) येथिल कोविड सेंटरला सेवा देणारे डॉक्टर आणि नर्सेस यांच्यासाठी शेडची व्यवस्था करण्यासाठी शहरातील सखी ग्रुपच्या अध्यक्षा प्रीती पाटील व सदस्यांनी पंधरा हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे सुपूर्द केला.
तालुक्यातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारासाठी मोहिदा शिवारातील शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे . शहरातील स्वयंसेवी संस्था दानशूर नागरिक यांनी या सेंटरला आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शहादा येथील सखी ग्रुपच्या सदस्यांनी शेड उभारण्यासाठी लागणारा निधी रुपये पंधरा हजारांचा धनादेश प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे , तहसीलदार डॉ.मिलिंद कुळकर्णी यांच्याकडे सुपूर्द केला . यावेळी सखी ग्रुपच्या प्रीती पाटील , ज्योती पाटील , रंजना पाटील , दिप्ती पाटील , वर्षा पाटील , जयश्री पाटील , नीता पाटील भगवती पाटील , लीना पाटील , नलिनी पाटील , जयश्री पाटील , सीमा पाटील व कविता पाटील उपस्थित होत्या.
Tags
news
