शहाद्यात प्रभागाची माहिती आता एका क्लिकवर जिल्ह्यात प्रथमच लोकप्रतिनिधीद्वारे असा उपक्रम



शहादा (प्रतिनिधी) : नगरपालिका प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका योगिता संतोष वाल्हे यांनी केलेल्या कामांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे . या प्रभागातील समस्या , तक्रारी त्यांच्या वेबसाईटवर करता येणार असून या वेबसाईटचा शुभारंभ जि.प.चे कृषी सभापती अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .  जिल्ह्यात प्रथमच लोकप्रतिनिधीद्वारे असा उपक्रम राबविण्यात आला आहे . याप्रसंगी नगरसेविका योगिता संतोष वाल्हे म्हणाल्या की , प्रभागातील लोकांना अधिक माहितीसाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन आजवर केलेल्या कामांचा लेखाजोखा पाहता येऊ शकणार आहेत . योगिता वाल्हे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच नगरपालिका निवडणूक नगरसेविका झाल्या आहेत . त्यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे . माझ्या कार्यालयात क्रमांक नऊ कसा विकसनशील करता येईल यासाठी नागरिकांच्या सूचना , समस्या व मार्गदर्शन घेऊन विकास करणार असल्याचेही त्या म्हणाल्या . या वेळी नगरसेवक संदीप पाटील , संतोष वाल्हे , सुरेश पाटील , सौरभ जहागिरदार , सागर कुवर आदी उपस्थित होते . दरम्यान नगरसेविका योगिता वाल्हे यांनी प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी व विकासासाठी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने