शिरपूर - श्रीराम जन्मभूमी मंदिर कामाच्या शुभारंभ निमित्त भुपेशभाई ग्रीन आर्मी च्या वतीने निमझरी येथे शिरपूर पॅटर्न बंधारे तसेच गावात विविध ठिकाणी नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते बुधवारी दि. ५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ६४० वृक्ष लागवड करण्यात आली.
श्रीराम जन्मभूमी येथे मंदिर कामाच्या शुभारंभ निमित्त कार्यक्रमात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन श्रीरामाच्या जयघोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल व प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने तसेच शिरपूर तालुक्यात लाखो वृक्ष लावून ते जगवून हरित क्रांती यशस्वीपणे राबविण्याची मोठी मोहीम "भुपेशभाई ग्रीन आर्मी" च्या वतीने सुरु आहे. शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात लिंब, बांबू, अंजन, चिंच, बेल, आवळा, करंज, सिताफळ, केठ, उंबर अशी पर्यावरण पूरक अनेक वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
निमझरी येथे वृक्षारोपण वेळी नगरसेवक तपनभाई पटेल, माजी पंचायत समिती सदस्य छगन गोरख गुजर, गोरख शंकर गुजर (माजी सरपंच), मनसाराम भिल (सरपंच), अभिमन चौधरी गुजर, रामकृष्ण नारायण गुजर, राजेंद्र गोकुळ गुजर, मच्छिंद्र गुजर, छोटु गुजर, रविंद्र गुजर, बजरंग भिल, किरण गुजर, अविनाश गुजर, अश्विन गुजर, अमोल पाटील, अजय गुजर, संदीप पाटील, प्रशांत पाटील, गोकुळ कुंभार, धनंजय पाटील, राजेश सोनवणे, संदीप माळी, किशोर चव्हाण, अतुल पाटील, राहुल माळी, प्रतिक ईशी, पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
माजी पंचायत समिती सदस्य छगन गोरख गुजर व अभिमन गुजर यांनी मनोगत व्यक्त करुन निमझरी गावाला माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी आजपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
भुपेशभाई ग्रीन आर्मीचे सदस्य धिरज देशमुख, बापू महाजन, ललित फिरके, रवी पाटील, बकुल अग्निहोत्री, प्रशांत पवार, जितू शेटे, बाबाजी महाजन, गिरीश सनेर, जय माळी, प्रविण बागले, दिपक बडगुजर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
Tags
news


