प्रतिनिधी ,राहुलकुमार अवचट दौंड ( पुणे )
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे जनतेत प्रबोधन करणारे ,
शिवरायांवर पोवाडे रचणारे शिवशाहीर ,कवी , कादंबरीकार ,
"साहित्यरत्न "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वञ साजरी केली जात असताना आज दौंड तालुक्यात सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले.
यवत येथे इयत्ता १० वी व १२ वी ला उत्कृष्ट गुण संपन्न केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाची सुरवात छञपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम नागरिक सरपंच रजियाभाभी तांबोळी या होत्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना पुष्ण अर्पण करण्यात आले
कार्यक्रमाच्या वेळी सॉनिटायझर व मास्कचा वापर करण्यात आला
विद्या विकास मंदिर विद्यालय येथील इ. १० वी च्या प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या अनुक्रमे अनुजा संतोष दोरगे, हर्ष नवनाथ कसबे व सिद्धी संदिप बागडे यांचा सन्मान करण्यात आला
इयत्ता १२ वी च्या पायल किसन खेडेकर , गौरी संभाजी कदम, शिरीन सलीम तांबोळी याचबरोबर या दोन्ही वर्गाच्या उत्कृष्ट गुण संपादीत केलेल्या गावातील अनेक विद्यार्थ्यांचा संविधान व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना आपला सन्मान होत असताना चेहऱ्यावर आनंद दिसत होता
त्याचबरोबर गावातील लोककलावंत यांना देखील आर्थिक मदत करुन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी वंचित आघाडीचे मा.उत्तमराव गायकवाड , रिपाईचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड , माजी सरपंच शामराव शेंडगे,माजी उपसरपंच सुभाषबापु यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष श्री दत्ता डाडर यांनी लोकशाहिर यांच्या कार्याबद्दलची माहिती दिली व यासाठी सरकारने लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली यावेळी उपस्थितांना जास्तीत जास्त पुस्तके वाचा असा संदेश दिला व उपस्थितांचे आभार मानले
यावेळी माहिती सेवाभावी संस्थेचे विनायक दोरगे व पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री सावंत सर यांनी केले
यावेळी लोककलावंतानी आपली कला सादर केली
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते
Tags
news
