धुळ्यात शुक्रवारी स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्र




धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे यांच्यातर्फे स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार 14 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या कालावधीत ऑनलाइन स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 
या सत्रात सचिन जोशी, इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, संतोष शिंदे, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अमोल सुर्वे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, एन. पी. पाटील, जिल्हा उद्योग केंद्र, धुळे, विजय चौधरी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासह जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील.
सदरचे सत्र हे गुगल मीट या ॲपद्वारे होईल. याबाबतची ऑनलाइन लिंक https://meet.google.com /izx-mzja-rpk अशी आहे. ऑनलाइन समुपदेशन सत्रात सहभागी होण्यासाठी पुढीन सूचनांचे पालन करावे. यात https://meet.google.com /izx-mzja-rpk या लिंकवर क्लिक करावे. गुगल मीट ॲप इन्स्टॉल नसेल, तर इन्स्टॉल करून घ्यावे. ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर Ask To Join वर क्लिक करावे. नियोति वेळेच्या दहा मिनिटे आधी जॉइन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हीडिओ व माइक म्यूट/बंद करावा. धुळे जिल्ह्यातील जास्ती उमेदवारांनी या स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी केले आहे.    

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने