ब्रेकींग न्यूज अखेर विध्यार्थी संगटनेचा विजय abvp च्या विद्यार्थ्यांना मारहाण करणारा पोलीस कर्मचारी निलंबित




धुळे -  काल धुळ्यात घडलेल्या घटनेवरून आज राज्य भर वादळ उठले होते.व दिवसभर निवेदन व विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या.अखेर वाढत्या दबावायामुळे त्या पोलिस कर्मचारी ला निलंबित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलन कार्यकर्त्यांना मारहाण करणारा पोलिस कर्मचारी कर्मचारी चंद्रकांत एस पाटील याचे निलंबन करण्यात आले .पोलीस उपाधिक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येणार  आहे.कालच्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्या समोर ABVP च्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणा नंतर राज्यात सर्वत्र या घटनेचा निषेध करण्यात आला…अखेर विद्यार्थ्यांना पंच मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबनाचा पंच बसला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने