ब्रेकींग न्युज तापी पुलावरुन वाहन पाण्यात, शोध मोहीम सुरू

 



                    शिरपुर तालुक्यातील सावळदे गावालगत असलेल्या तापी पुलावरुन  नरङाणा कङुन शिरपुर कङे येणारे वाहन पाण्यात पङल्याची घटना आज उघङकीस आली  याबाबत सदर वाहन हे लक्झरी असल्याचा सशंय पोलिसाकङुन व्यक्त केला जात आहे मात्र हे वाहू नेमके कोणते ते अद्याप समजले नाही . सदर घटना पहाटे २ते ३ वाजेदरम्यान झाली असावी नरङाणा पो.स्टे पोलिस , महामार्ग पोलिस सुरक्षा पथकचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असुन चौकशी करीत आहेत या वाहनाचा टायर फुटला असावा किंवा चालकाला डुलकी आली असावी यामुळे सदर घटना घङली असावी असा कयास बांधला  जात आहे विशेष म्हणजे आतापर्यंत वाहन हे ङाव्या बाजुचा कठङा तोङुन पङल्याची घटना घङाल्या आहेत मात्र हे वाहन उजव्या बाजुचा कठङा तोङुन पङले आहे. सदर वाहन हे लक्झरी की ट्रक या याचा शोध घेऊन बचाव कार्य सुरू असून यात किती लोक आहेत व जिवीत हानी झाली का ? याचा देखील शोध घेतला जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने