शिरपूर - तालुक्यातील मोठ्या संख्येने कामगार, मजूर, विद्यार्थी व इतर अनेक जण हे विविध जिल्ह्यात व परराज्यात अडकलेले आहेत. त्या सर्वांना परत आणण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन आमदार काशिराम पावरा यांनी पाठपुरावा केला.
शिरपूर तालुक्यातील असंख्य मजूर कामगार हे वीटकाम, बांधकाम गवंडी, शेतीकाम, ऊसतोड व अनेक कामे करण्यासाठी परजिल्ह्यात व परजिल्ह्यात मोठ्या संख्येने गेलेले आहेत. तसेच असंख्य विद्यार्थी व अनेक नागरिक हे देखील बाहेरगावी अडकले आहेत. सर्वांना ऑनलाईन अर्ज करणे हे शक्य नाही. अनेक जण फारच अडचणीच्या ठिकाणी असून त्यांना ऑनलाईन अर्जासह इतर कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य होतच नाही. अशा अनेक लोकांच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच बाहेर असलेल्या मजुरांची यादी मंजूर करून जिल्हाधिकारी यांनी त्या सर्वांना आणण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एन. ओ. सी.) द्यावे असे सांगितल्यावर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एन. ओ. सी. देण्याबाबत आश्वासन दिले.
शिरपूर तालुक्यातून बाहेर त्यांच्या गावी बाहेर जाणारे मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना मात्र शासनाच्या धुळे जिल्हा वेबसाईटवर (http://dhule.gov.in) या लिंक वर संपूर्ण माहिती भरावी लागणार असून ई-पास घेवून प्रवास करावा असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिरपूर शहर व तालुक्यातील रहिवासी असलेले विद्यार्थी, मजूर, कामगार तसेच इतर नागरिक यांना परराज्यातून व परजिल्ह्यातून शिरपूर येथे आणण्यासाठी शासनाकडे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सांगितले.
तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रवासी पास बाबत मॉडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यातून इतर राज्यात जाण्यासाठी श्रीमती प्रज्ञा बडे (जिल्हा पुनर्वसन अधिकारी धुळे) 78880 37189 व किशोर घोडके (जिल्हा खनिकर्म अधिकारी धुळे) 94051 97840), मुंबई व कोकण विभागात जाण्यासाठी पास मिळण्यासाठी प्रमोद भामरे उपजिल्हाधिकारी 75880 95799 व मिलिंद कोल्हे तहसीलदार 86685 54107. पुणे विभाग (पुणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) साठी तसेच नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार साठी या विभागात जाण्यासाठी श्रीमती सुरेखा चव्हाण उपजिल्हाधिकारी भूसंपादन 77092 77615 व श्रीमती सुचिता चव्हाण तहसीलदार 99700 88977. अमरावती, औरंगाबाद, नागपूर विभागात जाण्यासाठी गोविंद दाणेज उपजिल्हाधिकारी रोहयो 94221 52058 व संजय बोरसे जिल्हा समन्वयक जिल्हा स्तरीय वनहक्क समिती धुळे 94234 93391 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
