कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांची जयंती संपन्न







थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांची 97 वी जयंती बोराडी येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावरील स्मृतिस्थळावर घरगुती वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे,किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे,विश्वस्त लीलाताई रंधे,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे,विश्वस्त रोहित रंधे,शशांक रंधे, इ.उपस्थित होते.दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने बोराडी येथे संस्थेच्या सेवकांचे शैक्षणिक शिबिर आयोजित करण्यात येत असे.यावेळी संस्थेच्या प्रत्येक शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित असत.शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक समस्यांवर या शिबिरात मंथन होत असे. शिक्षण,विविध स्पर्धा परीक्षा,व्यवस्थापन,साहित्य,क्रीडा,समुपदेशन,व्यवसाय निर्मिती इ. क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक या शिबिरात मार्गदर्शनसाठी येत असत.पण यावर्षी कोरोनासंर्गामुळे लाॅकडाऊन असल्यामुळे शिबिराचे आयोजन झाले नाही.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने