दोंडाईचा बाजार समितीच्या वतीने कापूस खरेदी केंद्र सुरु,माजी मंत्री आ. जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ दररोज 4 हजार क्विंटल कापूस खरेदी होणार



दोंडाईचा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सीसीआय चे कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदी चा शुभारंभ माजीमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला शिंदखेडा तालुक्यातील तिन्ही जिनिंग मिळून दररोज 4 हजार क्विंटल कापूस खरेदी होणार आहे आज माजी मंत्री आ. जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते सुरवातीला दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग, नंतर बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग, आणि शेवटी शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंग या तिन्ही ठिकाणी खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला 
    यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, कामराज निकम, जि प सदस्य ज्ञानेश्वर भामरे, गटनेते अनिल वानखेडे, रवी उपाध्ये, रमेश टाटीया, तहसीलदार सुदाम महाजन, बाजार समितीचे सचिव पंडित पाटील, अरुण सोनवणे, उपसभापती नारायनसिंग गिरासे, जि प सदस्य पंकज कदम, डी एस गिरासे, माजी सभापती सुरेश देसले, विजय पाटील, सीसीआय चे अधिकारी आदित्य वामन , महेश कीतुकले, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते
     यावेळी बोलताना आ. रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात गेल्या 6 वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती होती गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने आणि बुराई नदी सह अन्य ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे झाल्याने यंदा  कापूससह गहू, मका , हे उत्पन्न चांगले आले, परंतु जवळपास 50 टक्के कापूस शिल्लक असतांना मात्र शासनाने सीसीआय चे खरेदी केंद्र बंद केले होते त्यातच कोरोना ची महामारी आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता म्हणून केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या साठी सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, बाजार समितीने ही ऑनलाइन नोंदणी करून दररोज 4 हजार क्विंटल कापुस खरेदी करण्याचे नियोजन केले असून प्रत्येक शेतकऱ्यांना टोकन पध्दतीने अतिशय सुटसुटीत व्यवस्था उभी केल्याबाबत बाजार समितीचे माजी मंत्री आ जयकुमार रावल यांनी अभिनंदन केले , बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थापन बाबत माहिती दिली सूत्रसंचालन डी एस गिरासे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने