अन्य राज्यात जाणार्‍यांना परवानगी देण्यासाठी धुळे जिल्यात नोडल अधिकारी नियुक्त - जिल्हाधिकारी




धुळे,  : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात अडकलेले स्थलांतरीत कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व अन्य व्यक्तींना धुळे जिल्ह्यातून त्यांच्या इच्छित स्थळी (राज्याबाहेर) जाण्याचे पास, ना हरकत देण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी देण्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बढे- मिसाळ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या १ मे रोजीच्या सुधारित आदेशानुसार लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात अडकलेले स्थलांतरीत कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना धुळे जिल्ह्यातून त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी व धुळे जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक आवश्यक असलेली परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी यादव हे सक्षम प्राधिकारी आहेत.या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रशासकीय विभागनुसार पास देण्यासाठी व ना हरकत देण्यासाठी अधिकार्‍यांना नोडल अधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. अशी माहिती प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने