शिरपूर-
शिरपूर शहर दि.७ मे २०२० पर्यंत कंटेन्टमेंट झोनमध्ये असल्याने लाकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि कृषीविषयक साहित्यांची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.आज देखील दि.५ मे २०२० रोजी शिरपूर नगर परिषदेने शहरातील दोन कापड दुकाने,भांड्यांचे दुकान आणि स्टेशनरीचे दुकान व पान मसालाची दुकान सील करण्यात आली आहे.एकूण आठ दुकानांवर शिरपूर न.प.चे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज ज्या पान मसाला दुकानावर कार्यवाही केली या दुकानावर मागील आठवड्यात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र तरी देखील जर असे मुजोर दुकामदार परत परंत नियम भंग करून नागरिकांचे जीव धोक्यात घालत असतील तर यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे विशेष म्हणजे या दुकानावर कार्यवाही होणेसाठी तक्रार देखिल दाखल करण्यात आली होती.
