शिरपूर प्रतिनिधी -
बलकुवे येथील राशन दुकानदार योगेश माधवराव पाटील हे केशरी शिधापत्रिका धारक यांना राशन देत नाही व पावती देत नाही व त्यामुळे त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करणे बाबत अर्जदार माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपूर जिल्हा धुळे यांनी मा जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब धुळे यांना मागणी केली आहे.
यात त्यांनी असे नमूद केले आहे की त्यांच्या कडे केशरी शिधापत्रिका आहे तरी लाकडाऊन ची परिस्थिती निर्माण झाल्या मुळे शासनाने केशरी शिधापत्रिका धारकांना प्रती युनिट पाच किलो धान्य गहु आठ रुपये किलो व तांदूळ बारा रुपये किलो प्रमाणे धान्य देण्याचे आदेश दिले आहेत तरी त्यामुळे मी दिनांक 3/5/2020रोजी धान्य घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा राशन दुकानदार योगेश माधवराव पाटील स्वता हजर होते परंतु त्यांनी मला धान्याची पावती देण्यास स्पष्ट नकार दिला मला माझ्या धान्यची पावती मिळणे हा माझा हक्क असुन माझे धान्य व पावती च्या हक्का पासुन त्यांनी मला वंचीत ठेवले आहे व त्यांचे दुकानात दर्शीणी भागात ग्राहकांना दिसेल त्याठिकाणी दक्षता समीती चे सभासद यांची यादी चे फलक व भावफलक, ग्राहकांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर,दुकान उघडण्याची वेळ बंद होण्याची वेळ असे कुठलेही फलक लावणे त्यांना बंधनकारक आहे परंतु राशन दुकानदार यांनी असे कुठलेही फलक लावले नाही त्याचा पुरावा म्हणुन मी व्हिडीओ चित्रीकरण केले आहे त्यात त्यांचे दुकानात कुठलेही फलक लावण्यात आले नाही असे स्पष्ट दिसत आहे तरी मी तो व्हिडीओ सोबत पाठवत आहे तरी राशन दुकानदार यांनी पावती न दिल्याने व कुठलेही फलक न लावल्याने त्यांचे विरुध्द विनाविलंब कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे या आधी देखील या गावातील रेशन बाबत वारंवार तक्रारी झाल्या आहेत मात्र आज पर्यंत ठोस कारवाही झाली नाही. मागील आठवड्यात देखील या दुकानदारांची चौकशी झाली असून याचा अहवाल व कारवाई प्रलंबित आहे मात्र तरी देखील या दुकानदाराची मुजोरी कमी होत नाही.यामुळे हा दुकानदार रेशन विभागातील अधीकारी याना जुमानत नाही की या मागे वारंवार अभय देण्यासाठी काही अर्थ कारण आहे की राजकारण या बाबत आता विविध चर्चा रंगात आहेत.
