थाळनेर ( प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ग्रामस्थांनी गावातील रेशन दुकानात बाबत लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाकडून नुकतीच चौकशी करण्यात आली. या चौकशीत तक्रारदारांना कळवण्यात न आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा विभागाकडून चौकशीचा फक्त फार्स करण्यात आला.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की दिनांक २१/३/२० रोजी थाळनेर येथील ग्रामस्थांनी गावातील चार रेशन दुकाना बाबत लेखी तक्रार तहसीलदार शिरपूर व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.या तक्रारीत नागरिकांनी सदर रेशन दुकानदार पावती प्रमाणे धान्य देत नाही व पावती देण्यास टाळाटाळ करतात. सदर ४ रेशन दुकानाची जबाबदारी २ दुकानदारांकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोना रोगाचा पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
पुरवठा विभागातील अव्वल कारकून अपर्णा वडुळकर यांनी १/५/२० रोजी पाळला भेट देऊन चौकशी केली.परंतु या चौकशीसाठी ज्यांनी तक्रार केली होती त्यांना कळवण्यात न आल्यामुळे व १ मे शासकीय सुट्टी असल्यामुळे ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लोक नियुक्त सरपंच प्रशांत निकम, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, प्रेमचंद शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तवर, कुबेर जमादार पत्रकार हेमंत चौधरी आदिनी रेशन बाबत गावकऱ्यांच्या तक्रारींचा पाढाच वाचला. अनेक भूमिहीन मजुरांना रेशन मिळत नाही व धनदांडग्याना रेशन मिळते. तसेच रेशन दुकानदार पावती देत नाही व कमी धान्य देत असल्याची तक्रार काही महिलांनी केली. यावेळी रेशन दुकानावर लाभार्थ्यांची यादी लावलेली दिसून आली नाही. यावेळीअनेक महिला आल्या होत्या त्यांनीदेखील रेशन बाबत विविध तक्रारी केल्या. यावेळी एका रेशन दुकानदाराने काही तक्रारदारांना घरून घेऊन आला व त्याने त्याची उलट तपासणी त्याने केली. त्यामुळे चौकशी पुरवठा विभाग करीत आहेत की रेशन दुकानदार करीत आहे असे चित्र यावेळी दिसून आले. यावेळी एका रेशन दुकानातील कर्मचारी परदेशी यांनी संबंधितअधिकाऱ्यासमोर असे कबूल केले की रेशन ची पावती या महिन्यापासूनच देत आहोत.त्यामुळे पुरवठा विभाग रेशन दुकानदारांवर काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. सदर चा रेशन दुकान वेळ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी वेताळे, सामाजिक कार्यकर्ते वामन कोळी, पत्रकार रतिलाल महाजन गावातील काही नागरिक व महिला उपस्थित होत्या.
