मुंबई:
_निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे._
*राज्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त असून या जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी ४ मे पासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारता येणार आहे. १२ मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
