दौंड इथल्या राज्य राखीव दलातील आठ जवानांची कोरोना



पुणे - दौंड इथल्या राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ)  आठ जवानांची कोरोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली खान यांनी दिली. आठ जवान कोरोनाग्रस्त आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीदरम्यान राज्यातील मुंबई सह इतर भागांमध्ये बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव बल गट क्र. ५ व ७ च्या जवानांच्या दोन तुकड्या 16 एप्रिल रोजी दौंड मध्ये दाखल झाल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
यातील 110 जवानांचा क्वारंटाईन कार्यकाळ संपल्यावर त्यांची मान्यताप्राप्त खाजगी लॅब मध्ये कोरोना विषाणू ची तपासणी करण्यात आली.यामध्ये आठ जवान कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.गंभीर बाब म्हणजे यातील एकही जवानांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. या कोरोनाग्रस्त जवानाना पुणे येथे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ.खान यांनी सांगितले.तसेच उर्वरित जवानांचा क्वारंटाईन कालावधी आणखी चौदा दिवसांनी वाढवला असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने