रेशन माल वाहतूक करण्याऱ्या वाहनाचा बोराडी जवळ अपघात



बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) शिरपूर-बोराडी रस्त्यावरील बोराडी येथील अमरधाम जवळ बोराडीहुन शिरपूरकडे जाणाऱ्या टाटा कंपनीची ४०७ गाडीचा एस्कल राँड तुटल्यामुळे गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. हयात तिन जण जखमी झाले आहेत.
      बोराडी येथे स्वस्त धान्य दुकानावर गहू व तांदूळाचा माल पोच करण्यासाठी शिरपूरहुन महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण कंपनीची ४०७ गाडी क्रमांक एम.एच.०८ एच ४७५८ गाडी माल खाली उतरून शिरपूर कडे जात होती.  
     हया गाडीमध्ये  तिन लोक होते. हयात चालक सुकनंदन देवीदास कोळी (वय-५०) राहणार वाघाडी,हमाल दिनेश माळी (वय-२६) शिरपूर, एकाचे नांव माहीत नाही. हयामध्ये चालक व एक व्यक्ती जबर जखमी झाले आहेत.हया जखमींना तातडीने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. गावातील शंशाक रंधे,भागवत पवार, शरद पाटील, निंबा पाटील आदींनी गाडीमधील अडकले जखमींना बाहेर काढून  मदत केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने