शहादा - शहादा तालुक्यातील कवळीथ या गावाजवळ वळण बंधारा असुन सदर बंधारा हा ब्रिटिश कालीन बंधारा आहे. सदर बंधाऱ्याचा सुमारे 2 ते 3 हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रास प्रत्यक्ष लाभ होत असतो तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे या बंधाऱ्याचे कालव्याची संरक्षक भिंत पडुन गेल्याने गोमाई नदिचे पाणी कालव्यात वळवता येत नाही. त्यामुळे सदर कालवा बंद पडला असुन लवकरच पावसाळा सुरु होणार आहे त्यामुळे सदर भिंत त्वरित दुरूस्त करण्यात यावी त्यासाठी निधीची तरतुद करण्यात येईल संबधीत यंत्रनेला अंदाज पत्रक तयार करण्याचे सुचना दिल्या तसेच जिल्हा नियोजन किवा इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून कालवा सुरु करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन हा प्रश्न मार्गी लावु असे आमदार राजेशजी पाडवी साहेब यांनी सांगितले यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन श्री बापु साहेब दिपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल भाई पाटील,माजी जि.प सदस्य सुनिल चव्हाण, योगेश पाटील,खेडदिगर संरपच अविनाश मुसळदे, विरसिंगजी पाडवी, विठ्ठलराव बागले,पाठबधारे अभियंता एम बी पाटील, मोहिदा संरपच गिरधर पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, ईश्वर पाटील,गोगापुर संरपच विजय सोनवणे, भागापुर संरपच निलेश पाटील, कवळीथ संरपच योगेश पाटील, उपस्थित होते.
