मेरा आंगण,मेरा रणांगण




नंदुरबार - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण राज्यात कोरोना विषाणू महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रातील मोदीजी सरकार विस्तारित स्वरूपात मदत करीत असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला दिली जात नसल्याने राज्यातील शेतकरी बांधव, मजुरवर्ग, व्यापारी, विध्यार्थी अडचणीत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता आज दिनांक २२ मे  रोजी संपूर्ण महाराष्ट्र भर भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील  महाविकास  आघाडी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाव ची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने आज नंदुरबार भाजपा च्या वतीने नंदुरबार विधानसभा चे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या नेतृत्वाखाली आपल्या निवासस्थानी "मेरा आंगण" "मेरा रणांगण" महाराष्ट्र बचावचे हातात फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवक मा.चारुदत्त कळवनकर, नगरसेवक मा.आनंदभाऊ माळी,मा.संजीव शाह,मा.मोहन खानवाणी मा.लक्ष्मणभाऊ माळी,मा.संतोष वसईकर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने