बोराडी-
जगभरात कोरोनाच्या साथीमुळे हाहाकार पसरला आहे.याला आटोक्यात आणण्यासाठी डाॅक्टर,पोलिस,आरोग्य कर्मचारी,परिचारिका आपल्या जीवाचा विचार न करता काम करत आहेत. म्हणून समाजातील काही घटक या देवदूतांचा वेगवेगळ्या पद्धतीने सत्कार करुन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करत आहेत.आज जागतिक परिचारिका दिवस आहे.आपल्या जीवाचा विचार न करता परिचारिका कोरोना युद्धात रुग्णांची
अहोरात्र शुश्रूषा करत आहेत.यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना लागण होऊ नये म्हणुन त्यांना दवाखान्यातच रहावे लागते.त्यानंतर सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागते.तरीही त्या मनापासून काम करत आहेत.या दिवसाचे औचित्य साधून धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे यांनी बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका आशा शिंदे व कल्पना वाघ यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.शिवचंद्र सांगळे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.मनिष पाटील,शिरपूर तालुक्याचे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रसन्न कुलकर्णी, विखरणचे सरपंच प्रविण पाटील,रमण पावरा,बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.निलिमा देशमुख, डाॅ.सुनिल पावरा,राज निकम,रविंद्र शिंदे,भागवत पवार, राजु सुर्यवंशी,एस.एस.पावरा,एस.ए.जगदाळे,आर.के.चित्ते,शेखर माळी,हिंमत चितोडकर इ. उपस्थित होते.
