शिरपूर तालुक्यात धोबी समाजात दुसरा विवाह साध्या पध्दतीने पार पडला विवाहात होणारा खर्च वाचवुन देश व समाजासाठी वापरावा: एकनाथराव बोरसे पंतप्रधान निधीत रु.११००० ची मदत






   शिरपूर- सर्वत्र कोरोनाचा विषाणुचा फैलाव झाल्याने संपुर्ण देशच लाॅकडाऊन झाला. परिणामी अनेकांना नियोजित विवाह सोहळे देखील स्थगित वा रद्द करण्यात आले. तर काही विवाह हे सोशल डिस्टन्स पाळत अत्यंत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. बोरसे-खैरनार परिवाराने यातुन मार्ग काढून लाॅकडाऊनचे सर्व नियम पाळत सोशल डिस्टन्स ठेवुन मोजक्याच नातेवाईकांचा उपस्थितीत अत्यंत साध्या पध्दतीने विवाह सोहळा पार पाडला. यातुन त्यांचा वेळ आणि पैसा तर वाचलाच मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इतरांसमोर आदर्श देखील उभा केला.
   शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील प्रगतीशील सधन शेतकरी, परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष तथा शिरपूर सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भास्कर गोपाल बोरसे व सांगवीच्या माजी उपसरपंच तथा परिट (धोबी) सेवा मंडळ महिला विभागिय अध्यक्षा सौ. अरुणाबाई बोरसे यांचा व्दितीय चि. राहुल हा उच्चशिक्षित असुन वापी (गुजराथ) येथे एका नामांकित कंपनीत टेकस्टाईल इंजिनिअर पदावर नोकरी करीत आहे. तर धुळे तालुक्यातील आर्वी येथील बांधकाम ठेकेदार सध्या नरडाणा येथे वास्तव्याला असलेले संजय दौलत खैरनार यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. अंकिता या दाम्पत्यांचा विवाह ठरल्याप्रमाणे समाजाच्या रुढी परंपरेनुसार मोठ्या थाटामाटात होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे दोन्ही परिवाराने सामंजस्याने निर्णय घेवून शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करत शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे तोंडाला मास्क लावुन सोशल डिस्टन्स ठेवत अतिशय साध्या पध्दतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
   *अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, जि. प सदस्य योगेश बादल, पं. स. सदस्या सौ. प्रभाबाई कोकणी, सरपंच सौ. छायाबाई देशमुख, माजी जि. प. सदस्य कान्हा चारण, माजी पं. स. सदस्य कन्हैया पावरा, सामाजिक कार्यकर्ते अशोक शर्मा, विजय सोनवणे व दोन्ही परिवाराकडील आई, वडील, प्रमुख नातेवाईक अश्या २० जणांचा उपस्थितीत (दि.१२.मे) रोजी भटजीच्या मंत्रोपचाराच्या साक्षीने तालुक्यात धोबी समाजात हा दुसरा विवाह सोहळा पार पडला*. हा विवाह साध्या पध्दतीने व्हावा यासाठी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी पुढाकार घेतला होता.
   *लाॅकडाउनमुळे हा आदर्श विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला मात्र कोरोनाचे संकट संपल्या नंतरही असे आदर्श विवाह मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज असुन मोठ्या स्वरुपात थाटामाटात लग्न सोहळा करुन अनाठाई खर्च करणे वधु-वर पित्याला परवडणारे नाही. त्यामुळे येणार्‍या काळात सुध्दा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडुन विवाहात होणारा खर्च देशहितासाठी व समाज कार्याला अर्पण करावा असे आवाहान अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी केले
   कोरोना माहामारीच्या लाॅकडाऊनमुळे पुर्व नियोजित विवाह तिथि नुसार नियमाचे पालन करुन साध्या पध्दतीने गर्दी व वाजागाजा न करता लग्न सोहळा उरकल्या नंतर बचत झालेल्या पैशातुन पंतप्रधान निधीत रु.११००० हजार ची मदत शिरपूर सरपंच संघटना तालुकाध्यक्ष तथा परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष वर पिता भास्कर बोरसे हे देणार आहेत.
   वर राहुल व वधु अंगिता या नवदापत्यांना माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, सरपंच संघटना प्रदेशाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, धुळे जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपूर नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे आदिंनी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्यात. साध्या पध्दतीने विवाह सोहळा केल्याबद्दल दोन्ही परिवाराचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने