कोठली येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरा 60 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप.




नेहरू युवा केंद्र नंदूरबार व युवकमित्र परिवाराचा उपक्रम

शहादा - नेहरू युवा केंद्र भारत सरकार,नंदूरबार संलग्न युवकमित्र परिवार व राजपूताना ग्रुप कोठली यांच्यातर्फ कोठली ता.शहादा येथे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.यावेळी शेतमजूर,विधवा व निराधार कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.तब्बल 60 शेतमजुर,स्थलांतरीत कुटूंबांना खाद्यतेल,साखर,विविध डाळी, साबण,कोलगेट,मसाले यांचे 'किराणा माल किट'वाटप करण्यात आले.तसेच गावातील नागरिकांना कोरोना संकटकाळात सावधगिरी बाळगण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी युवकमित्र परिवाराचे संचालक बादलसिंग गिरासे,प्रवीण महाजन, प्रदीपसिंग राजपूत, प्रवीण खुमानसिंग गिरासे, गौरव राजपूत,दिपक राजेंद्र गिरासे,राहुल गिरासे,योगेश गिरासे यांचे सहकार्य लाभले.देवेंद्र राजपूत यांनी सर्वांचे आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने