शहाणा गावाचा जलकुंभ कोसळण्याची भीती



शहादा - शहाणा (ता.शाहादा) पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले ७०,००० ७५ मि. लिटरचे पिण्याच्या पाणीचे जलकुंभ ४८ वर्षा आधी बांधण्यात आले असून हे कुंभ दिवसेंदिवस जीर्ण होत चालले आहेत,अचानक एखाद्या दिवशी कोसळण्याची भीती गावकऱ्यांना वाटत असे,                                                                     ग्रामपंचायत शहाणा लोकसंख्या ३४२२ असून इतक्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम हे जलकुंभ करत असे परंतु आता जीर्ण अवस्थेत झाले असून  गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत असे म्हणून जिल्हा प्रशासनाला व तालुका प्रशासनाला अर्जाद्वारे  कळविण्यात आले,हे जलकुंभ पाडून नवीन जलकुंभ उभारण्यात यावे असे अर्ज प्रशासनाला  सरपंच रवींद्र पाडवी व ग्रामस्थांनी केले असून  अध्याप  या कामाची अंमलबजावणी  झालेली नसून विशिष्ट वेळेला अचानक जिवीतहानी होऊ नये असे ग्रामस्थ भावना व्यक्त करत आहेत,अशी अवस्था होण्याअगोदर प्रशासनाने तातडीने हे जलकुंभ पाळण्याचे कार्य मार्गी लावावे असे ग्रामस्थांचे म्हणे आहेत, ग्रामपंचायत सभेमधे वारंवार हे प्रश्न उपस्थित करत ग्रामसेवक व सरपंचांना ग्रामस्थ हे जलकुंभ पाळण्याचे आवाहान करत असे. तरीदेखील आजवर हे कार्य वाऱ्यावर सोडण्यात आले.असुन ग्रामस्थ प्रशासनावर खंत व्यक्त करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने