शहादा - आज सकाळी शहादा येथे काही विद्यार्थी सकाळी डोंगरगाव रोड वरील दिलीप जैन यांचा घरा समोर थकलेल्या अवस्थेत बसले होते. सामाजिक कार्यकर्ते दिलीप जैन व माजी नगरसेवक अशोक मुकरदे यांनी विचारना केली असता हे विद्यार्थी नाशिक येथुन पाई चालत आले व धडगाव येथे जात असल्याचे कळताच अशोक मुकरदे यांनी कर्तव्य दक्ष आमदार राजेशजी पाडवी साहेब यांना फोन वरून माहिती दिली असता लागलीच आमदार साहेब यांनी दखल घेत क्षणाचाही विलंब नकरता विद्यार्थांना गाडीची व्यवस्था करून दिली विद्यार्थी मित्रांनी कृतज्ञता व्यक्त केली आम्ही धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात राहतो व आमचा या मतदारसंघाची कोणताही संबध नसतानाही आमदार राजेशजी पाडवी साहेब यांनी आमची घरी जाण्यास व्यवस्था केली यांना कधीही विसरणार नाही अशी भावना व्यक्त केली व मना पासून आभार व्यक्त केले यां वेळी माजी नगरसेवक अशोक मुकरदे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जैन, भाजपाचे दिनेश खंडेलवाल, पत्रकार ईश्वरभाई पाटील, जितेंद्र भावसार उपस्थित होते.
