शिरपूर - शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी शनिवारी दि. 23 मे रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेर अभयारण्य मधील असंख्य गावे, पाड्याना तसेच कोडीद गटातील व दहिवद गटातील गावे पाडयाना भेट देऊन तेथील अनेक बाबींची पाहणी दौरा करून सविस्तर माहिती करुन घेतली. या सर्व भागांचा अहवाल जिल्हाधिकारी व वन विभागाला कळवून तालुक्यात कोणतीही समस्या राहू नये यासाठी प्रयत्नशील आहेत. या काही भागात त्यांनी मोटरसायकलने सुद्धा आढावा दौरा केला
माजी मंत्री अमरिशभाई पटेल व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याशी चर्चा करून आमदार काशीराम पावरा हे अनेर अभयारण्य मधील तसेच
तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी शनिवारी दि. 23 मे रोजी अगदी सकाळपासूनच गुऱ्हाळपाणी येथून कोडीद गटातील असंख्य गावे, पाडे तसेच दहिवद गटातील अनेक गावे व पाड्याना भेट देऊन रस्ते, पाण्याची व्यवस्था, शाळांची अवस्था, अंगणवाडीची काय परिस्थिती, तसेच विज पुरवठा बाबत अशा अनेक बाबांना बाबींची पाहणी करून सर्व अहवाल जिल्हाधिकारी तसेच वनविभागाला देण्याबाबत पाहणी दौरा केला.
अभयारण्यातील असंख्य पाडे तसेच गावे हे सर्व अनेर अभयारण्य क्षेत्रात असल्या कारणाने येथील विकास कामांसाठी वन विभागाच्या अडचणी येत असल्याने त्या जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकार्यांकडे पाठपुरावा करुन शासनाकडे मंजूरी साठी पाठविण्यासाठी हा प्रत्यक्ष पाहणी व भेट दौरा असल्याचे आमदार काशिराम पावरा यांनी यावेळी सांगितले.
रस्ते, पाण्याची टाकी, पंप, शाळा इमारत, आंगणवाड़ी इमारत, विहीर, विद्युत ऊर्जा तसेच एकूण घरे, लोकसंख्या याबाबत आढावा घेतला या वेळी
सुखराम पावरा, अनिल चौधरी, रविन्द्र मोरे, सायसिंग पावरा, राजधर पावरा, किसन पावरा, सत्तरसिंग पावरा, सुनील पावरा, नकला पावरा, जगत पावरा तसेच त्या त्या भागातील सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन जुनापाणी पाड़ा, सापपाणी ते जामन्या पाणी आमदार काशीराम पावरा यांनी सुमारे मोटर सायकलने 10 किलोमीटर प्रवास केला. आज शनिवारी पिरपानी, खूटमुडी, टिटवापाणी, फत्तेपुर पाड़ा, सापपाणी, जामन्या पाणी, कालिडोकी पाणी, दोंदवाडा पाड़ा, महादेव पाड़ा जुने, तेल्यादेव पाडा आदी अनेक ठिकाणी जाऊन आढावा पाहणी दौरा केला.
