संजीवनी हेल्पिंग हॅन्ड फॉन्डेशन ह्या संस्थेचा आदिवासी भागात मदतीच हात






शिरपूर - शिरपूर तालुक्यात आदिवासी भागात गावातील गरजू लोकांना लॉक डॉऊनच्या काळात पौष्टीक आहार देण्यासाठी संजीवनी हेल्पिंग हॅन्ड फॉन्डेशन ह्या संस्थेने मदतीसाठी पुढे हात सरसवला असून शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा येथे वाटप केले आहे. संजीवनी हेल्पिंग हॅन्ड फॉन्डेशनची टिम पुढारकार घेतला आहे. दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी संजीवनी हेल्पिंग हँड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात वितरण करण्यात आले आहे.आतापर्यंत संजीवनी हेल्पिंग हॅन्ड फौंडेशनच्या माध्यमातून 120 कुटुंबापर्यंत ही मदत पोहोचवली आहे. या साठी शांतीलाल फिरंग्या पावरा व त्यांची पत्नी संगीता शांतीलाल पावरा पुढाकाराने  गावातील गरजू कुंटूबाना मदत करणे कोरोना आजाराच्या काळात तसेच लॉकडाऊनच्या काळात स्वखर्चाने,  चिंचपाणी,अनेरडॅम  येथे मुखवटा (Mask)  बिस्कीट तसेच डेटॉल साबणाचे वाटप केले गेले.कोणत्याही प्रकारचे शासकीय मदत न मिळवता संगीता पावरा यांच्या महाविद्यालयातून आर्थिक सहाय्यता मिळून गावातील वृद्ध, विधवा, गरीब रोजगार कामगारांना अन्नधान्य पुरवण्याचे प्रयत्न केले आहेत.
 निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कर मुंबई.कॉलेज नि दिलेल्या फंडिंग मुळे आज आम्ही ही सुविधा गरीब लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहे. असे या दाम्पत्याने सांगितले आहे यांच्या या समाज कार्यमुळे अनेक गरजूंना आधार मिळाला असून यांच्या या मदत अभियान बदल लोकांनी आभार व्यक्त केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने