धुळे- काल शिरपुरात शहरात एकाच दिवसात 4 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे .काल रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील १३ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तर शिरपूर येथील पाटील वाडा येथील ३९ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत शिरपूर तालुक्यात १२ रुग्ण आढळले असून त्यापैकी ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे तर ३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरीत ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.