शिरपूर शहरात 3 पॉझिटिव्ह धुळे शहर, साक्री तालुका, शिरपूर शहर मिळून आणखी 6 कोरोना पाॅझिटिव्ह...




शिरपूर - आज धुळे जिल्यात 6 कोरोना रुग्णाची वाढ झाली असून शिरपुरात देखील 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे शिरपूर शहरावर कोरोना चे संकट अधिक गडद झाले असून नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिरपूर शहरात अंबिकानगर परिसर, खालचे गाव मंदिर परिसर / दोन पुरूष, तसेच एक महिला (वय 50) मरणोत्तर पाॅझिटिव्ह आली आहे.

 नागरिकांना जाहीर सूचना

शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, 
शिरपूर शहरात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे भूपेश नगर, काझी नगर, अंबिकानगर, खालचे गाव बालाजी मंदीराजवळ, दारू मोहल्ला, मारवाडी गल्ली हे भाग सील करण्यात आले आहेत. येथील नागरीकांनी घराबाहेर पडू नये. या भागातील सर्व व्यवहार दि. २६ मे ते ३० मे २०२० पर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास कालावधी वाढविण्यात येऊ शकतो. या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेसाठी न.प.कडून प्रभाग अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा.(संपर्क क्रमांक नागरीकांना घरपोच देण्यात येतील.) शहरातील इतर भागात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या काळात चालू राहतील. नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. 
आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. शहरातील कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. सर्वेक्षण पथकांना खरी माहिती सांगा. लक्षणे आढळल्यास त्वरीत काॅटेज हाॅस्पिटल, शिरपूर येथे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने