शिरपूर - तालुक्यातील भाटपुरा गावाजवळ शिरपूर पॅटर्न अंतर्गत बंधाऱ्याचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते तसेच प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दि. 24 मे रोजी सायंकाळी करण्यात आले.
यावेळी भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के. डी. पाटील, होळनांथे येथील जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश चंपालाल चौधरी, भाटपुरा सरपंच शैलेंद्र चौधरी, पिळोदा माजी सरपंच योगेश पाटील, अनारसिंग जाधव, दरबार वंजारी, इंजिनीयर पी. बी. पाटील, मंगल गुजर, वसंत नारायण पाटील, वसंत पोलाद जाधव, तोताराम वंजारी, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, भू-वैज्ञानिक दिनेश जोशी, महेंद्र तोताराम पाटील, प्रकाश पाटील, स्वप्नील चौधरी, भिका माळी, ज्ञानेश्वर दोरिक, अण्णा वंजारी, हिम्मतसिंग राजपूत, एकनाथ राठोड (पोलीस पाटील), अमोल पाटील, सुनील कुंभार, लोटन सोनार, नरेंद्र कुंभार आदि उपस्थित होते.
तालुक्यातील भाटपुरा- सावेर गाव दरम्यान पोलिस चौकी जवळ नडीच्या नाल्यावर शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याचे भूमिपूजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले. तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिरपूर पॅटर्न चे काम यापुढेही तालुक्यातील उर्वरित भागात सुरूच राहणार आहे. तालुक्यातील कोणताही भाग किंवा कोणतेही शेतकरी बांधव पाण्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी शिरपूर पॅटर्न च्या कामांची मालिका अखंडपणे सुरू ठेवणार आहोत असे सांगितले.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर पॅटर्नचे काम सातत्याने व नियमितपणे सुरू ठेवले आहे. शिरपूर तालुक्यात आतापर्यंत 225 पेक्षा जास्त शिरपूर पॅटर्न बंधारे चे काम पूर्ण झाले आहे. शिरपूर तालुक्यातील बराचशा भागात जमिनीत भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चितच वाढली आहे. अनेक ठिकाणी मुबलक जलसाठा निर्माण झाला असून तालुक्यातील उर्वरित भागात देखील टप्प्या-टप्प्याने शिरपूर पॅटर्न अंतर्गत बंधारे करण्याचे काम सुरूच आहे.
