थाळनेरला तापी नदीत उडी मारून एकाची आत्महत्या



थाळनेर(प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे किरकोळ घरगुती भांडणातून एकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 /5/2019 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास थाळनेर गावातील मयत लक्ष्‍मण तुकाराम लोहार(५५) याने घरगुती किरकोळ भांडणातून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत मयताचे  साहित्य नदीकाठी मिळाल्यानंतर खात्री झाली. API सचिन साळुंखे यांनी गावातील पट्टीचे पोहणारे मच्छिमार यांच्या सहकार्याने एका तासात खोल पाण्यातून प्रेत काढण्यात यश मिळवले. यानंतर सदर प्रेत कॉटेज हॉस्पिटल येथे पोस्टमार्टम साठी नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी ताब्यात मिळाल्यानंतर येथे तापी नदीचा काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई असा परिवार आहे. याबाबत थाळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.API सचिन साळुंखे व मच्छीमारांच्या अथक प्रयत्नामुळे  बॉडी मिळून आली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने