आज शिरपुरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण




शिरपूर - शिरपूर शहरात साठी आज देखील कोरोना ने दस्तक दिली असून शिरपूर येथील दोन महिला रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. बाधीत रूग्णाच्या ३८ वर्षीय पत्नी व ६० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ६० वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान , जिल्ह्यातील एकूण पॉजीटीव्ह रूग्णांची संख्या १३४ इतकी झाली आहे.
शिरपूर शहराची रुग्णसंख्या 17 तर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 23 झाली आहे. सर्व उपाय योजना करून देखील बाहेर च्या संपर्कामुळे शिरपूर तालुक्यात कोरोना ने प्रवेश केला असून शहरात कोरोना चा वाढता प्रसार प्रशासना साठी डोके दुःखी ठरत आहे. शहरात काल पासून जनता करफू लागू करण्यात आला आहे मात्र मागील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मूळे शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. आणि हा शहरात चिंतेचा विषय झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने