शिरपूर साठी दिलासा देणारी बातमी



शिरपूर प्रतिनिधी - कोरोना काळात शिरपूर शहर व परिसरावर अचानक संकट कोसळले होते. मागील 50 दिवसात आपल्या शहराला तब्बल 4 वेळा कॉरंटीन करावे लागले हे देखील आपले दुर्दैव च आहे. मात्र संकट काळात मोठ्या धीराने सामना करत शिरपूर तालुका वाटचाल करत आहे. आधी अमोदा गावातील रुग्णांनी कोरोनवर यशस्वी मात केली . या नंतर आमोदे गावातील सापडलेला रुग्ण सुद्धा कोरोना मुक्त झाला त्यामुळे त्याला देखील त्याच्या मूळ गावी पाठवण्यात आले आहे .आहे.तसेच अर्थे येथील इतर संपर्कातील सहा   रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.शिरपूर शहरातही आता कोरोना चा शिरकाव झाला आहे.शहरात कोरोना पॉजिटीव्ह मंगळवारी रात्री उशिरा आढळला होता त्यास देखील उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.  फक्त आपण काळजी घेतली पाहिजे.आपल्याला जास्त जपावे लागेल सुरक्षित राहावे लागेल. घरात रहा.काळजी घ्या.सोशल डिस्टन ठेवा.स्वतःची व इतरांची काळजी घ्या  अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन शिरपूर प्रशासन यांनी केले.
  
               

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने