विचार येता मनात
मांडतो तेच लिहण्या
बुद्धी जरी अल्प
विचार लोकात रुजवण्या..
तोडकं मोडकं लिहतो
मन माझं दिसतं
कामातुन वेळ असतो
लिखाण तेव्हा असतं...
घरच्या भाकरी उकिरड्यावर
असंचं सारं वाटतं
मिळतं नाही काही
मनाला खरं पटतं....
गाडगेबाबांचा चालु वारसा
तुकारामांचा दावतो आरसा
संदेश राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा
कुप्रथा अंधश्रद्धा मोडण्या वसा....
आवाज सामान्य गरिबांचा
संस्कृती सृष्टी प्राणिमात्रात
जीवन करतोय सत्पात्र
सत्यता मज विचारात .....
छंद लागला लिहण्याचा
भ्रष्ट्राचारींना लागते प्रहारास
मिळाला यातुन मानसन्मान
दुराचारीना लेखणी ठेवतो झोडपण्यास ....
पर्यावरण
होतं घनदाट जंगल
चोहीकडे सारं हिरवं
पशुपक्षीची गजबज सर्व
होतं छान पर्व...
वृक्षांनंपासुन हवा शुद्धीकरण
होई माणसाचं भरण
आलं विकासचं तोरण
उगवलं नवं औदोगीकरण...
प्रगती झाली छान
भौतिक सुखाला मान
उडू लागलं विमान
गेलं निसर्ग संतुलन.....
उडाला प्रदूषण धुराडा
वृक्ष प्राणी पशुपक्षी
माणुस त्यांचा भक्षी
जाऊ लागला अंतरीक्षी.....
प्लास्टिक कचरा वाढला
जीव गेला गाडला
व्हायरस आता पसरला
कर्म भोग अवतरला....
छेडछाड नको सृष्टी
ठेवु दुर दुरदृष्टी
व्हा सारी रक्षी
निसर्गानेच दिली दृष्टी....
प्रदीप मनोहर पाटील, गणपूर
