अंबरनाथ ( शैलेश सणस )कल्याण लोकसभा मतदार संघाचे लाडके *खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे* यांच्या निवडीला *आज १ वर्ष पूर्ण झाले*, याबद्दल खासदारांचे अभिनंदन करण्यात आले!
सर्वत्र कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असूनही सफाई कामगार व घंटा गाडी कर्मचारी यांनी अंबरनाथ स्वच्छ व कचरामुक्त करण्यासाठी *कोरोना योद्धा* म्हणूनच कार्यरत आहेत. सुभाष साळुंके नेहमी कामगारांना मदत व सहकार्य करीत असतात,
*आज पुन्हा एकदा डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या खासदार पदाच्या एक वर्ष पूर्ती निमित विभागातील वॉर्ड ४४ व ४५ मधील अं.न. प चे सफाई कामगार, घंटागाडी चालक,मुकादम, फवारणी कामगार यांना फूड पॉकेट, तसेच संसर्ग होऊ नये, सुरक्षतेसाठी sanitizer bottle, कापडी मास्क,hand gloves इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.*
*यावेळी संवाद च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके, पत्रकार राजेश जगताप, पत्रकार अशोक नाईक ,अरुण भावे काका उपस्थित होते.*
