आदिवासी पाड्यात आरोग्य सेवेची दुर्दशा, गरोदर महिलेला बांबूच्या झोळीत ठेवून, खांद्यावरुन तब्बल तीन किलोमीटर धावले गावकरी




शिरपूर - शिरपूर तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो.आदिवासी योजनांच्या मद्यमातून करोडो चा निधी येतो.दर वर्षी शेकडो बिले मनरेगा व इतर योजनेच्या माध्यमातून रस्ता निर्माण च्या नावाने पास केली जातात.पण रस्ते काही दिसत नाही मग हा निधी जातो कुठे ?
तालुक्यात गुऱ्हाळपाणी,निशानपणी,भुवणपानी,थुवणपणी असे अनेक गावे अतिदुगरम भागात आहेत.मात्र सेवा सुविधांच्या नावाने नेहमीच यांचा तोंडाला पानी पुसले जाते.100% तालुका डिजिटल शाळा म्हणून घोषित आहे यात 40 % गावांना आज ही लाईट नाही  रस्ते तरी देखिल आम्ही पुरस्कार मिळवतो. या गावांना जोडणारा रस्ता येथे नाही त्यामुळे गावाच्या वेशीवर वाहन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तालुक्यातील वाड्या-वस्त्या अजूनही जुन्याच समस्यांशी झगडत आहेत. 
प्रसव कळांनी विव्हळणाऱ्या महिलेला बांबूच्या झोळीत ठेवून, खांद्यावरुन तब्बल तीन किलोमीटर धावत नेल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे.महिलेला जशा प्रसव कळा वाढत होत्या, तसं बांबूची झोळी वाहणाऱ्यांना पायाचा वेग वाढवून धावावं लागत होतं. प्रगत महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ही घटना घडली. सुदैवाने तीन किमी धावल्यानंतर 108 नंबरची रुग्णवाहिका आली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेची सुखरुप प्रसुती झाली.

शिरपूर तालुक्याजवळ असलेल्या थुवानपाणी या अतिदुर्गम भागातील नागरिकांवर ही वेळ आली. अतिदुर्गम असलेल्या थुवानपाणी या आदिवासी पाड्यावर पक्का रस्ता नाही. या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर गुऱ्हाळपाणी हे गाव आहे. थुवानपाणीतून गुऱ्हाळपाणीपर्यंत कच्च्या रस्त्याने चालतच यावं लागतं. थुवानपाणी गावातील एक महिला गरोदरी होती. तिला प्रसववेदना सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होतं. मात्र रुग्णवाहिका थुवानपाणी गावात पोहोचणं शक्य नव्हतं.

प्रसववेदना सुरु झाल्याने कुटुंबियांनी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करण्याचं ठरवलं. त्यासाठी मोठा बांबू काढून त्याला साडी बांधली आणि त्याची झोळी करुन महिलेला झोपवलं. मग ती झोळी बांधलेला बांबू उचलून पाड्यावरील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने कूच केली झोळीतून तिला गुऱ्हाळपाणी गावापर्यंत नागरिकांनी खांद्यावर पळत नेण्यात आले.

त्यानंतर तेथील आशा कार्यकर्तीने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागवली. सुदैवाने रुग्णवाहिका पोहोचली आणि महिलेला बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे तिची सुखरुप प्रसुती झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

या भागासाठी रस्ता आणि आरोग्य उपकेंद्र द्यावे अशी मागणी ग्रामस्थ गेल्या आठ वर्षापासून करत आहेत  तर दुसरी कडे या घटनेमुळे आरोग्य विभागाचे व बांधकाम विभागाचे अब्रू चे लक्तरे वेशीवर टांगले गेले आहेत.या तालुक्यात अनेक वेळा पंचायत समिती सभापती हा आदिवासी समाजातून असतो तर लालुक्याला आदिवासी आमदार देखील 10 वर्ष पेक्षा अधिक काळापासून आहेत तरी देखील तालुक्यात आदिवासी ची अवहेलना संपत नाही हे मोठे दुर्दैव आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने