कोरोना अपडेट - 17 मे नंतर कसे असेल महाराष्ट्रात लॉक डाऊन कोरोनाचा वाढता प्रसार राज्यासाठी डोकेदुखी




मुंबई वृत्तसंस्था  : महाराष्ट्रात  अनेक शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे.  व ग्रामीण भाग पर्यंत तो पोहचला आहे. जण जीवन सुस्त झाले आहे अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार व्यक्त केला आहे. हे भाग कोरोनामुळे अत्यंत प्रभावित झाले आहेत.

सूत्रांकडून मिळलेल्या माहिती नुसार गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध ठीकाणी प्रतिबंध वाढविण्यासदंर्भात चर्चा झाली.यात सरकारने 31 मेपर्यंत मुंबई एमएमआर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लवकरच राज्याचा हा  विचार केंद्राला लिखित स्वरुपात दिला जाणार आहे.
 राज्यातील इतर भागांमध्ये 17 मेपर्यंत लॉकडाऊन 3.0 संपण्यापूर्वी केंद्राद्वारा घोषित केल्या जाणाऱ्या दिशानिर्देशांना लागू करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.बुधवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 25,922 रुग्णसंख्या होती. ज्यामध्ये 975 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 15,747 रुग्ण असून 596 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णालय आणि क्वारंटाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. येत्या काळात रुग्णसंख्या वाढू नये असा प्रयत्न आहे.  मात्र या व्यतिरिक्त इतर जिल्यातील रेड, औरेंज व ग्रीन झोन नुसार थोड्या प्रमाणात जण जीवन सामान्य करून अर्थ व्यवस्था सूर करण्याचा विचार सुरू असून केंद्र सरकार काय दिशा निर्देश देते यावर पुढील निर्णय होणार आहेत.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने