शिरपूर - कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. यामुळे महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यानुसार महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या वतीने एकत्रितरीत्या गोळा करण्यात आलेली रक्कम 23 लाख 78 हजार 514 रुपयांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात आले
संस्थेचे अनुदानित कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन 12,78, 514 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात आले. त्यांपैकी संस्थेच्या दोन महाविद्यालयांचे एकूण 2,42,478 रुपये रोख स्वरूपात शासन आदेशानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये याआधीच जमा करण्यात आले
तसेच संस्थेच्या विना अनुदानित कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन एकूण रक्कम रुपये 10,39,938 व संस्थेतर्फे 60,062 असे एकूण रुपये 11,00,000 पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये आर. टी. जी. एस. (RTGS) द्वारे असा एकूण संस्थेमार्फत रु. 23,78,514 मोठा निधी जमा करण्यात आला.
तसे पत्र तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. यावेळी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल उपस्थित होतया व्यतिरिक्त यापूर्वीच दि शिरपूर पीपल्स को-ऑप. बँक लि. शिरपूर तर्फे देखील पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये 2 लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये 2 लाख रुपये असे एकूण 4 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत
यापूर्वी देखील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातर्फे केरळ पूरग्रस्तांना 28 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. याप्रमाणे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रयत्नशील असते.
