शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे संपूर्ण महाराष्ट्रात महत्वाकांक्षी पाऊल. जलशुद्धीकरण केंद्र व न. पा. संचालित सर्व इमारती टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर (सोलर प्लांट) कार्यान्वित करणार - नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल.



शिरपूर - शिरपूर वरवाडे नगर परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रात महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून जलशुद्धीकरण केंद्र व नगर परिषद संचालित सर्व इमारती टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर (सोलर प्लान्ट) कार्यान्वित करतआहोत. यामुळे विज बिलात फार मोठ्या प्रमाणात बचत होईल. तसेच प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट नगर परिषदेची आपली उज्ज्वल परंपरा यापुढेही सुरुच राहणार असे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांनी स्पष्ट केले आहे.शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि. 14 मे रोजी स्थायी समितीची सभा झाली. नगर परिषदेच्या फक्त जलशुद्धीकरण प्लांट चे वार्षिक वीजबिल 1.80 कोटी रुपये येते. नगर परिषदेचा जास्त खर्च विजबिलावर होतो. या खर्चात बचत होण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने 1 मेगा वॅट क्षमतेचा सोलर प्लांट बसविण्याबाबत निर्णय या वेळी सर्वानुमते घेण्यात आला.तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद मार्फत इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, नगरपरिषदेची संपूर्ण इमारत, पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल तसेच ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने विज बिल भरण्यात येते त्या सर्व ठिकाणी टप्प्याटप्प्याने सोलर प्लांट मार्फत वीजपुरवठा करण्यात येऊन वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नगरपरिषदे मार्फत वीज बिलातील खर्चात कपात होऊन त्यामुळे इतर विकास कामांमध्ये निधी वापरता येईल असा नगर परिषदे मार्फत प्रयत्न होत आहे.ही अतिशय महत्वपूर्ण अशी योजना असून जलशुद्धीकरण केंद्र व इतर ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करण्याचे शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे आदर्शवत कार्य पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल यात शंका नाही.माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका मुख्याधिकारी अमोल बागुल, सर्व अधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने