कल्पेश राजपूत,शहादा
-युवकमित्र परिवारातर्फ वडाळी ता.शहादा येथे कोरोना संकट काळात अविरत वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टर बांधवांना पीपीई किटचे यशस्वी वितरण करण्यात आले.यावेळी वडाळी येथील पोलीस पाटील गजेंद्रगिर गोसावी,युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन कोठलीकर,पत्रकार चंद्रमणी रायसिंग, अल्ट्रा इरिगेशनचे राहुल वाल्हे,श्री.दत्त मेडिकलचे अरुण जाधव,पतंजली सेवा केंद्राचे मनोज रोकडे हे उपस्थित होते.
कोरोना संकटकाळात वडाळीसह पंचक्रोशीतील डॉक्टर्स जीवाची पर्वा न करता रुग्णांना अविरत सेवा देत आहेत.अशा डॉक्टर्सच्या आरोग्याची काळजी घेणे हे युवकमित्र परीवाराचे आद्य कर्तव्य असून उत्तम प्रतीचे पीपीई किट वितरित करत असल्याचे प्रवीण महाजन कोठलीकर यांनी सांगितले. वडाळी पंचक्रोशीत बामखेडा त.सा. येथे कोरोना पेंशट आढळून आल्याने परिसरात शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.याधर्तीवर पीपीई किट मिळाल्याने डॉ.नंदलाल चौधरी,डॉ.सचिन जगताप,डॉ.महेंद्र कुकारी, डॉ.चंद्रकांत चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.
