शिरपूर प्रतिनिधी - कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांची दुकानावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी बोराडी परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांचे गट तयार करून सुरक्षित शारीरिक अंतरासाठी थेट गटांमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बी बियाणे पोहोचवण्यासाठी गटप्रमुख नियुक्त केले आहेत न्यू बोराडी गावातील गटप्रमुख म्हणून श्री कुमार सिंग थावरया पावरा यांनी भूमिपुत्र गटामार्फत व बुडकी येथील श्री शिवाजी रामदास पावरा यांनी रुक्माबाई शेतकरी उत्पादक गटामार्फत सुरक्षित अंतर ठेवून खते व बी बियाणे वाटप केले आहे .सदरील खताचे वाटप करताना मा. आमदार श्री काशीराम जी पावरा, मा. डॉक्टर तुषार जी रंधे, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तर सिंग पावरा ,तालुका कृषी अधिकारी ए.पी.निकुंभ,कृषी सहाय्यक बी जी वाघ, पी डी सोनवणे,व्ही. पी.पावरा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठांचे वितरण करण्यासाठी प्रयत्न केले.
शेतकऱ्यांचे गट तयार करून खते बी-बियाणे आता मिळणार बांधावर तालुका कृषी अधिकारी एपी निकुंभ यांचे उपक्रम
byMahendra Rajput
-
0
