नमन शूरवीरा... ( नेताजी सुभाषचंद्र बोस )




काळ गुलामीत फिरंग्यांचा 
लढत होते वीर 
ओरिसात कटक गाव 
जन्मले पुत्र क्रांतीवीर... 

सुपुत्र जानकीनाथ यांचा 
प्रभावती पोटी जन्मले 
इंग्रज बोलले रायबहाद्दर 
नेताजी  क्रांतीपुरुष झाले... 

गांधीजीची पदवी  देशभक्त 
कांग्रेस अध्यक्षपद भूषवले 
मवाळ जहाल प्रवाह 
जहाल शस्र अवलंबिले.... 

इटलीत जाऊन मिळाले 
पाठींबा घेऊन आले 
आझाद हिंद स्थापिली 
इंग्रजास  ताकतीने घाबरविले... 

झेंडयाखाली तरूण आले 
आझादी पर्व आणिले 
तुम मुझे खुन दो 
मै तुम्हे आझादी दूंगा बोलले .. 

गांधीजींना राष्ट्रपिता म्हणाले 
महान क्रांतिकारी झाले 
नमन या शुर विरास 
जय हिंद आसमंत निनादले... 

 प्रदिप मनोहर पाटिल 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055©®

विषय :- कविता म्हणजे.... 

मनातुन आलेला भाव 
घेऊन सृष्टीचा बोध 
नवंनवं विचारांचा शोध 
घेत रहस्याचा वेध... 

यमकास घालुन साद  
गमकाचा कुठं उन्माद 
लयीत मांडत भाव 
आनंदाची मिळते दाद.... 

कल्लोड भाव भावनांची 
छटा  आकाश ताऱ्यांची 
आक्रोश व्येथा  मांडण्याची 
सद्विचार आनंद फुलण्याची... 

मांडणी सल अंतरीची 
उत्सव जाणीव नात्यांची 
वाटचाल भावनांवर स्वार 
मंद पणती  प्रकाशाची....

गाथा तेज शोर्याची 
साथ  होते प्रेमाची 
उब माय माऊलीची 
गीत मांडणी  कवी कलाकाराची... 

प्रदिप मनोहर पाटिल 
मु. गणपूर ता. चोपडा. 
जिल्हा. जळगाव 
पिन. 425108
मो. 9922239055©®


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने