पोलिसांन वरील ताण कमी करण्याच्या शिरपूर पॅटर्न, राज्यभरात या प्रयोगाची आवश्यकता

 

 शिरपूर प्रतिनिधी-  देशात आणि राज्यात कोरोना या आजाराने मागील पंचेचाळीस दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. आजच्या या जैविक युद्धामध्ये पहिल्या पायरीवर प्रमुख  योद्धा म्हणून  आरोग्य सेवेतील डॉक्टर्स तसेच कामगार आणि पोलीस , एस आर पी आणि सफाई कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा या बिकट परिस्थितीमध्ये  आरोग्यसेवेची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागाने घेतली असून  रस्त्या रस्त्यावर आणि चौकाचौकात लॉक डाऊन आणि संचार बंदीचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी पोलीस बांधवांवर आली आहे. यातील सर्वच पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य निभावत आहेत. परंतु कोरोणाचे हे संकट काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस हे संकट अधिक गडद  होत आहे. यात प्रामुख्याने पोलिस यंत्रणेवर फार मोठा ताण आला असून आता त्यांना मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत आहे मागील दीड महिन्यांपासून अविरत सेवा देणाऱ्या पोलीस दलातील अनेक जवानांना सेवा देत असताना कोरोनाशी जीवघेणा सामना करावा लागत आहे राज्यात आज 700 पेक्षा अधिक जवानांना कर्तव्य बजावत असताना कोरोणाची लागण झाली आहे.  आणि 6 कर्मचारी यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपलेही समाजाप्रती आणि देशाप्रती काही देणे लागते अशी सेवाभावी वृत्ती दाखवत पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तव्य बजावण्यात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिरपूर शहरातून विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी एनसीसी कॅडेट चे काही विद्यार्थी, भारतीय सैन्य दल व इतर   सेवेतूनसेवानिवृत्त झालेले जवान आणि कोरोना वारीयर्स विदयार्थी यांनी एकत्र येत  प्रशासनाला विनंती केली होती आम्हाला या जैविक युद्धामध्ये योद्धा म्हणून काम करण्याची इच्छा असून आम्ही विनामूल्य सेवा देण्यास तयार आहोत तरी आम्हाला परवानगी देण्यात यावी  अशी मागणी मा   तहसिलदार सो शिरपूर यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तहसिलदार सो यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी सो धुळे व माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे यांच्याकडे सादर करून याबाबत मार्गदर्शन मागवले असता सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन नियम आणि अटी व आपले  कर्तव्य त्याची सांगड घालून या सर्व सेवा करणाऱ्या लोकांना सेवेची संधी देण्यात आली. मागील काही दिवसांपासून हे सर्व विद्यार्थी आणि विविध सेवांमधील   सेवाभावी लोक  शहरात आणि तालुक्यात आपली निशुल्क सेवा देत असून पोलिसांना त्यांच्या कार्यात मदत करत आहे यामुळे थोड्या प्रमाणात का असेना पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. आणि संघर्षं करून आज शिरपूर तालुका कोरोना मुक्त झाला आहे. मदतीचा हा शिरपूर पॅटर्न खरोखर दखल घेण्यासारखाच आहे.
 आज राज्यभरात सर्वत्र जवळपास अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे लॉक डाऊन आणि संचारबंदी किती काळ चालेल हे सांगणे अवघड आहे. लोकांच्या संयमाचा बांध फुटला असून अनेक ठिकाणी लॉक डाऊन आणि संचार बंदीला झुगारून विनाकारण लोक रस्त्यावर येताना दिसत आहेत. ही सर्व परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी  पोलीस दलावर असताना  त्यांना देखील अनेक प्रकारच्या अडचणी येत असून मानसिक आणि शारीरिक थकवा देखील आता जाणवू लागला आहे. त्यामुळे आज त्यांना मदतीची गरज भासू लागली आहे यासाठी पर्याय म्हणून सरकार मिलिटरी ची मदत घेण्याच्या देखील विचारात आहे. मात्र प्रायोगिक तत्त्वावर शिरपूर तालुक्यात राबवलेला उपक्रम राज्यभरात नियोजन करून वापरला गेला व सेवाभावी लोकांची मदत घेतली तर निश्चितच पोलिसांवरील ताण कमी होऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे अशा या जैविक युद्धजन्य परिस्थिती मध्ये विनामूल्य सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या विचार करून त्यांनाही सेवेची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे याबाबत शासन पातळीवरून योग्यता विचारविनिमय होऊन कार्यवाही झाल्यास मदतीचा शिरपूर पॅटर्न पोलिसांसाठी व प्रशासनासाठी नक्कीच फलदायी असेल त्यामुळे विविध जिल्ह्यात आणि राज्यभरात अशा उपक्रमांची गरज आहे. आणि या सेवा भावी लोकांच्या मदत घेवून आपल्या पोलिस दल व इतर विभाग यांची मदत होईल आणि सर्वांच्या मदतीने व सहकार्याने आपण या घातक विषानुवर मात करू यात शंका नाही . त्यामुळे  ज्या प्रमाणे मुख्यमंत्री यांनी आरोग्य सेवा साठी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पुढे येण्यास सांगितले होते त्याच प्रमाणे आवाहन केल्यास मदतीचे शेकडो हात पुढे येतील म्हणून आज मदतीचा शिरपूर पॅटर्न  राज्यभरात वापरण्याची गरज आहे.एक मेका साहाय्य करू विजय आपलाच आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने